Share

Cabinet expansion | मंत्रिमंडळ विस्तारात नितेश राणे, रवी राणा, बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळणार?

Cabinet expansion | मुंबई : येत्या 12 किंवा 13 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपुर्ण राज्याचं लक्ष लागेल्या या मंत्रीमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane), समाजवादी पार्टीचे रवी राणा (Ravi Rana) आणि प्रहारचे बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना मंत्रीपद मिळणार का असा सवाल उपस्थित होतं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारामध्ये एकूण 23 मंत्र्यांच्या समावेश होणार आहे. त्यामुळे एकूण 23 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप आणि शिंदे गटात 50-50 टक्क्यांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आलीय.

तसेच, भाजपकडून यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये आमदार संजय कुटे, नितेश राणे आणि रवी राणा यांना मंत्रिपद मिळण्याती शक्यता आहे. तर शिंदे गटाकडून बच्चू कडू, संजय शिरसाठ आणि भरत गोगावले यांना संधी मिळू शकते. शिंदे गटातील हे तीनही नेते मंत्रिपदासाठी आग्रही आहेत.

दरम्यान, शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा होती. अखेर ती चर्चा खरी ठरणार आहे. शिंदे गटाचे सर्व आमदार गुवाहाटीला गेले होते. हे सर्व आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते, असं सांगण्यात आलं होतं. तसेच या दौऱ्यादरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली नाही, असंही शिंदे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Cabinet expansion | मुंबई : येत्या 12 किंवा 13 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपुर्ण राज्याचं लक्ष …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now