कोणतीही राजकीय किंमत चुकवावी लागली तरी चालेल, पण नाणार होवू देणार नाही

नितेश राणे

मुंबई – कोकणामध्ये नव्याने येवू घातलेल्या नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाला दिवसेंदिवस विरोध वाढताना दिसत आहे. एका बाजूला शिवसेनेकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये नाणार प्रकल्प होवू देणार नसल्याच सांगितल जात आहे, तर दुसरीकडे या प्रकल्पाला आम्ही कायम विरोध करत राहू, त्यासाठी कोणतीही राजकीय किंमत चुकवावी लागली तरी चालेल म्हणत आमदार नितेश राणे यांनी नाणार होवू देणार नसल्याच सांगितल आहे. दादर चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नितेश राणे आले होते तेव्हा त्यांनी नाणार प्रकल्पाबाबत आपली भूमिका मांडली.

कोणी कितीही एमओयू करू देत पण नाणार प्रकल्प होणार नाही, तसेच एमओयुमध्ये कुठेही हा प्रकल्प कोकणात होणार असल्याच लिहिलेलं नाही. त्यामुळे तो प्रकल्प कोठेही करा आमचा पण कोकणात हा प्रकल्प नको असे देखील नितेश राणे यावेळी म्हणालेत.

नाणार प्रकल्पाचे पाप हे शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे यांचे आहे. यांच्या उद्योग मंत्र्यानी सुरुवात केली. जर यांनी आधी पासूनच विरोध केला असता तर आज ही वेळच आली नसती म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली

2 Comments

Click here to post a comment