महाराष्ट्र मॉडेल देशात राबवणार का? आकडे का लपवता?; राऊतांच्या प्रश्नांची सरबत्ती आणि भरती पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

sanjay raut vs bharati pawar

नवी दिल्ली : संसदेचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात कोरोना विषयावर चर्चा सुरु असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत टीकास्त्र सोडलं आहे. तुम्ही मृतांचा आकडा का लपवता ? सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र मॉडेलच कौतुक करून ते देशभरात राबवाव असं म्हटलं आहे, तुम्ही ते राबवणार का ? असे सवाल राऊत यांनी राज्यसभेत उपस्थित केले. यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी उत्तर दिलं.

‘गंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह दफन केले गेले. हे जगाने पाहिलं. त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारही झाले नाहीत. या मृतदेहांची विटंबना झाली, कायदो सांगतो मृतदेहांचा अपमान हे सुद्धा बेकायदा आहे. आम्ही परत एकदा मृतदेहांना मारलं, चिरडलं, अपमानित केलं. मात्र माझा सरकारला सवाल आहे, तुम्ही मृतांचे आकडे का लपवता? सरकारी आकडे आणि प्रत्यक्ष आकडे काही वेगळेच आहेत,’ असा आरोप सनी राऊत यांनी केला.

यासोबतच, ‘महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे मान्य, पण महाराष्ट्र सरकारच्या कामाची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. महाराष्ट्र मॉडेल देशात राबवा असं सुप्रीम कोर्ट म्हणालं, तुम्ही राबवणार का? मुंबई मॉडेलचं कौतुक मद्रास कोर्टाने केलं. कोव्हिड सेंटर, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत कोर्टाने काय म्हटलंय ते तुम्ही वाचा, महाराष्ट्र -महाराष्ट्र काय करता, तुम्ही महाराष्ट्र येऊन बघा, सरकार कसं काम करतंय,’ असं म्हणत संजय राऊत चांगलेच कडाडले.

यावर उत्तर देताना भारती पवार म्हणाल्या, ‘सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेश आपआपली आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे सोपवत असते. त्यामुळे केंद्राने आकडे लपवण्याचा प्रश्न नाही. राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशांनीही आकडे लपवल्याचा रिपोर्ट नाही. काही राज्यांनी आकडे सुधारित केले आहेत.’

महत्त्वाच्या बातम्या

IMP