नागपूर : केतकी चितळे वादग्रस्त पोस्ट मुळेच जास्त चेर्चेत असते. नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या पोस्टमुळे केतकी चितळे हिला अटक झाली आहे. १८ मे पर्यंत केतकीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता केतकीची दोन वर्षापुर्वीची पोस्ट चर्चेत आहे १ मार्च २०२० मध्ये केतकीने एक पोस्ट केली होती. आता या पोस्टमुळेही केतकीच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
नवबौद्ध समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल नागपूर जिल्ह्यात कपिल नगर येथील पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महासचिव वर्षा शामकुळे यांनी आता केतकी चितळे विरोधात ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
केतकी चितळे हिने १ मार्च २०२० रोजी ‘नवबौद्ध 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात तो धर्म विकासासाठीचा हक्क’ अशी फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या. केतकी चितळे हिच्यावर ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वर्षा शामकुळे यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळे केतकीच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<