Share

T20 World Cup | 15 वर्षानंतर फायनलमध्ये भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार?

टीम महाराष्ट्र देशा: या टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये खूप चढ-उतार आले आहे. 2 वेळा वर्ल्ड कप चॅम्पियन वेस्टइंडीज (West Indies) या वर्षी सुपर 20 मध्ये देखील पोहोचू शकला नाही. तर, एकीकडे माजी चॅम्पियन इंग्लंड (England) ला आयर्लंड (Ireland) ने पराभूत केले. तर दुसरीकडे झिम्बाब्वे (Zimbabwe) ने माजी चॅम्पियन पाकिस्तान (Pakisthan) संघाला पराभूत केले. रविवारी झालेल्या सामन्यामध्ये नेदरलँड्स (Netherlands) ने दक्षिण आफ्रिका (South Africa) चा 13 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. गट 2 सामन्यांमध्ये बांगलादेशने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. भारतीय (India) संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून उपांत्य फेरीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.

टी 20 विश्वचषक (T20 World Cup) फायनलमध्ये भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार?

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटांमध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारतीय संघाने उपांत्य फेरीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. दरम्यान, निर्णय सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाने बांगलादेश संघाला हरवल्यास ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. याचा अर्थ असा की भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ बाद फेरीमध्ये पोहोचतील.

न्यूझीलंड आणि इंग्लंडसोबत त्यांचा उपांत्य फेरीमध्ये सामना होणार आहे. दोन्ही देशांच्या संघासोबत सामन्यामध्ये पाकिस्तान आणि भारत यांना यश मिळाले तर अंतिम फेरीमध्ये त्यांची गाठ पडू शकते. पूर्वी 15 वर्षे आधी 2007 मध्ये टी 20 विश्वचषक कपच्या अंतिम सामान्यमध्ये भारताने पाकिस्तानला 5 धावांनी पराभूत करून विजेतेपद आपल्या नावावर केले होते.

टी 20 वर्ल्ड कप बद्दल सांगायचे झाले, तर भारत आणि पाकिस्तान यांनी आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले आहे. यामधील भारताने 6 सामने जिंकले आहेत. 2007 मध्ये झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानी संघाला दोनदा पराभूत केले होते. तर, पाकिस्तान संघ या स्पर्धेमध्ये एक सामना जिंकण्यात यशस्वी ठरला होता. गेल्यावर्षी ओमान आणि यूएई झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तान संघाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. भारत आणि पाकिस्तान यांनी टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 12 सामने खेळले आहे. त्यामध्ये भारताने 9 तर पाकिस्तानने 3 सामने जिंकलेले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: या टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये खूप चढ-उतार आले आहे. 2 वेळा वर्ल्ड कप चॅम्पियन …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now