मुंबई : अभिनेता हृतिक रोशन(Bollywood actor Hrithik Roshan) हा त्याच्या सिक्सपॅक बॉडीमुळे तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत चर्चेत असतो. सुझान खानसोबत (Suzanne Khan) घटस्फोट (divorce) झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. हृतिक- सुझान जरी वेगळं झाले असले तरी त्यांच्या मुलांच्या योग्य संगोपनासाठी सोबत दिसतात. आता घटस्फोट घेतल्यानंतर हृतिकचे आयुष्य किती बदलले,अभिनेता हृतिक पुन्हा लग्न करणार का? अशा चर्चा रंगल्या असून नुकतंच या सर्व प्रश्नांवर हृतिकचे वडिल राकेश रोशन यांनी खुलासा केला आहे.
हृतिक रोशन आणि सुझान खान यांना विभक्त होऊन बरीच वर्षे उलटली आहेत. मात्र आजही दोघं बऱ्याच ठिकाणी एकत्र फिरताना, मुलांसोबत वेळ घालवताना दिसतात. आजही या दोघांनी त्यांच्यातील मैत्रीच नाते जपले आहे. विशेष म्हणजे अनेकदा ते दोघेही मुलांसोबत व्हेकेशन ट्रीपवरही जातात. तसेच हृतिकसोबत वेगळं झाल्यानंतर सुझान तिच्या आयुष्यात मुव्हऑन झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ती अर्सलन गोणीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे हृतिक मात्र त्याच्या करिअरला वेळ देताना दिसत आहे. त्यासोबत रिहान आणि रिधान (Rihan and Ridhan) या दोन्ही मुलांच्या संगोपनात व्यस्त आहे.
दरम्यान हृतिकचे वडील अभिनेते राकेश रोशन (Actor Rakesh Roshan) यांनी नुकतंच एका मुलाखतीत “हृतिक आणि सुझानचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांच्यात मैत्रीपूर्ण नाते होते. विशेष म्हणजे कोर्टात घटस्फोट झाल्यानंतर हृतिक लगेच बाहेर आला. त्यावेळी त्याच्या गाडीसाठी तिने गेट उघडले होते. यावरुन तिचे कॅरेक्टर स्पष्ट दिसून येते. या सर्व गोष्टी तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही. त्या आतून येतात.” असा खुलासा केला.
ज्येष्ठ अभिनेता राकेश रोशनला हृतिकच्या पुन्हा लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आलेल्या प्रश्नाबद्दल ते म्हणाले, “त्याच्या नशिबात जे लिहिले आहे ते होईल. माझी इच्छा असो वा नसो, काहीही होणार नाही. जे होईल ते होईल आणि ते चांगलेच होईल. मला फक्त एवढंच सांगायचंय की हृतिक जसा आहे तसाच राहिला पाहिजे.” यामुळे हृतिकच्या आयुष्यात कोणतं वळण येणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान हृतिक रोशनने २००० मध्ये सुझान खानशी लग्न केले होते. या दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते दोघेही इंडस्ट्रीतील आदर्श जोडप्यांपैकी एक मानले जात होते. पण २०१३ ला काही कारणामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्या बातम्या खोट्या असून शिवसेनेत फक्त…’, आदित्य ठाकरेंनी दिला ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम
- गोवा भाजप पर्रीकरांचा वारसा पुढे नेताना दिसत नाही म्हणत ‘या’ मंत्र्याने ठोकला भाजपला रामराम
- यंदाचा IPL सीजन महाराष्ट्रात घेण्यासाठी शरद पवार आग्रही, …BCCI चा B प्लानही तयार
- मोदींच्या ‘सुरक्षेतील त्रुटी’ला जबाबदार कोण? हायकोर्टात आज होणार सुनावणी
- “…ब्युटी पार्लर सुरु करण्याबाबत जादूची कांडी फिरली आणि ठाकरे सरकारने यू टर्न घेतला”