हार्दिक पांड्या बॉलिंग करणार का? बीसीसीआयने दिले मोठे उपडेट

hardik

अबुधाबी : काही दिवसातचं टी 20 विश्वचषक 2021 ला सुरुवात होणार आहे. 17 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जाणार आहे. आयपीएल संपल्यानंतर लागेचच टी 20 विश्वचषकाला सुरुवात होईल. अशा परिस्थितीत, साहजिकच आयपीएल खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना परिस्थितीनुसार स्वतःशी जुळवून घ्यायचे असेल. टी -20 विश्वचषकासाठी घोषित केलेल्या भारतीय संघाचे खेळाडू देखील सध्याच्या आयपीएल हंगामाचा एक भाग आहेत. यातलाच एक म्हणजे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या. मात्र, आयपीएलमधील एक सामना सोडला तर हार्दिक सातत्याने फ्लॉप फॉर्ममध्ये दिसला आहे.

हार्दिकने २०१९ ला पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन केले. पण हार्दिक आधीसारखी सतत गोलंदाजी करताना दिसला नाही. मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत त्याने गोलंदाजी केली. मात्र, नंतर आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात तो गोलंदाजी करू शकला नाही. यूएईत मुंबईला चारपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळाला तरी हार्दिक केवळ फलंदाज म्हणून संघात होता.

त्यामुळे आता टी-२० विश्वचषकात हार्दिक गोलंदाजी करणार की नाही असे प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहेत. यावरच आता निवड समितीनं बुधवारी केलेल्या टीम इंडियातील बदलानंतर या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट झालं आहे.

टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात शार्दुल ठाकूरची एन्ट्री झाली आहे. त्याच्या एन्ट्रीमुळे हार्दिक आगामी वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करणार नाही हे जवळपास स्पष्ट झालं आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमनं दोन दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याचा फिटनेस रिपोर्ट पाहिला. त्या रिपोर्टनंतरच हार्दिक टी20 वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करण्याची शक्यता नाही, असं त्यांनी बोर्डाला कळवलं आहे.

प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘हार्दिक आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करणार नाही. तो फक्त फलंदाज म्हणून आपली भूमिका बजावेल. स्पर्धेच्या पुढील टप्प्यात तो पूर्ण फिट झाला तर बॉलिंग करेल, पण तो इतक्यात बॉलिंग करणे शक्य नाही. असं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या