fbpx

भाजपमध्ये जाणार आणि शंभर टक्के मंत्री होणार- अब्दुल सत्तार

टीम महाराष्ट्र देशा : मी काही दिवसात भाजपात जाणार असून, मी शंभर टक्के मंत्री होईन, असा दावा औरंगाबादेतील सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच घोंगडं भिजत असतानाच, आता राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात अब्दुल सत्तारांची वर्णी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये घेण्याबाबत भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विरोध आहे. भाजपचे सिल्लोड तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे आणि माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्याबरोबर अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये घेण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.

गेल्या काही काळापासून अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून गिरीश महाजन, रावसाहेब दानवे अशा राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा भाजपप्रवेश निश्चित मानला जातो. पण, भाजपकडूनच अब्दुल सत्तार यांच्या भाजपप्रवेशाला विरोध होताना दिसत आहे.