प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी मोदी सरकारकडून ट्रम्प यांना आमंत्रण

टीम महाराष्ट्र देशा : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी मोदी सरकारकडून ट्रम्प यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. भारताच्या आमंत्रणाचा अमेरिकन सरकारनं अजून स्वीकार केलेला नाही. मात्र एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासन या आमंत्रणाबद्दल सकारात्मक विचार करत असल्याची माहिती दिली आहे .

मोदींच्या परराष्ट् दौरे आणि परराष्ट्र धोरणावर वारंवार टीका होत असते. परंतु जर डोनाल्ड ट्रम्प प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले तर हा मोदी सरकारचा मोठा विजय ठरेल. भारताच्या आमंत्रणावर अमेरिकेच्या प्रशासनाकडून  अजून उत्तर आले नाही. मात्र ट्रम्प प्रशासनाकडून भारताच्या आमंत्रणाचा सकारात्मक विचार सुरू आहे.

दोन्ही देशांमध्ये राजकारणाच्या चर्चांना उधान आले आहे. या अनुषंगानेच ट्रम्प यांना आमंत्रण पाठवले आहे. 2015 च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अमेरिकेचे मा. अध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ट्रम्प यांनी भारताच्या आमंत्रणाचा स्वीकार केल्यास, त्यांची भारत भेट अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण ठरेल. जगभरातील सर्व देश ट्रम्प यांच्यासोबत सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. ट्रम्प यांच्या विकृत स्वभावामुळे अमेरिकेसोबत चांगले संबंध ठेवणं अनेक देशांसाठी जिकीरीचे ठरत आहे.

भारतानं रशियासोबत एस-400 क्षेपणास्त्रांसाठी करार केला आहे. त्यामुळेदेखील भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले चित्र काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाल होत. मात्र हे संबंध सुधारण्याचं आव्हान मोदी सरकारसमोर आहे. व्यापार शुल्क, इराणसोबत भारताचे ऐतिहासिक संबंध आणि उर्जा करार यांच्या पार्श्वभूमीवर भारतानं ट्रम्प यांना प्रजासत्ताक दिनाचं आमंत्रण दिलं असल्याच स्पष्ट होतंय त्यामुळे आता प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार का?याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मोदींनी केले ट्रम्प यांचे सांत्वन

‘फर्स्ट लेडी’ बनण्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन पत्नी आमने -सामने