रवी शास्त्रींची जागा मिळणार धोनीला?

रवी शास्त्रींची जागा मिळणार धोनीला?

shshtri

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा संघात परतणार आहे. माजी कर्णधार धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या तीन प्रमुख ट्रॉफी जिंकल्या आहेत. हेच कारण आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही बीसीसीआयने धोनीला पुढील टी -20 विश्वचषकासाठी संघासोबत राहण्यास राजी केले आहे.

धोनीची टीम इंडियाच्या मेंटोरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धोनीची मेंटोरपदी नियुक्ती झाल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. धोनीची मेंटोरपदी का निवड करण्यात आली हा प्रश्न तर आहेच पण ‘रवी शास्त्री यांचं मुख्य प्रशिक्षक म्हणून भविष्य आता किती सुरक्षित आहे? असा प्रश्न देखील निर्माण होऊ लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी धोनीला मेंटोर म्हणून भारतीय संघातआणण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता. पण धोनीची भारतीय संघात निवड होणार असल्याचे खूप कमी लोकांना माहित होत. धोनीची मेंटोरपदी निवड करण्याचा प्रयोग किती यशस्वी होईल हे पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये टी -20 विश्वचषक स्पर्धा सुरू होईल तेव्हा दिसेल. जर भारताने टी -20 विश्वचषक जिंकला आणि शास्त्रीने निवृत्तीचा निर्णय घेतला, तर धोनी निश्चितच प्रबळ दावेदार असेल. दरम्यान, रवी शास्त्री यांचा करार लवकरच संपणार आहे. आणि जर शाश्त्री यांचा करार वाढवला नाही तर धोनी हा शास्त्री यांच्या जागेचा प्रबळ देवदार मनला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या