मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.
मात्र, भाजपने त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रीपद सोडावं या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर अशातच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ‘हे आरोप गंभीर असून राष्ट्रवादीतील नेत्यांसह चर्चा करून लवकरात लवकर पक्ष म्हणून निर्णय घेतला जाईल’ असे संकेत दिले आहेत. राजकीय वर्तुळात त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असली तरी राष्ट्रवादीमधील एका गटाचा त्यांच्या राजीनाम्याला विरोध असल्याच्या देखील चर्चा आहेत.
आता स्वतः धनंजय मुंडे यांनी या चर्चांवर खुलासा केला आहे. ‘मी राजीनामा दिलेला नाही, मला पक्षाने राजीनामा मागितलेला नाही, मी माझी भूमिका पक्षासमोर मांडलीय’ असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, ‘या प्रकरणाबाबत मी शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर बाजू मांडली आहे. राजीनाम्याबाबत आदरणीय पवार साहेब व पक्षातील सर्व नेते विचार करून निर्णय घेतील’ असं ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मुंडे प्रकरणात मोठा ट्विस्ट : आरोप करणाऱ्या ‘त्या’ महिलेविरोधात भाजप नेत्याने केली पोलिसात तक्रार
- शौचालयाच्या कामातही पैसे खाणारे हे शिवसेनेवाले विकास काय करणार : निलेश राणे
- नोटीस पीरियड पूर्ण न करता नोकरी सोडताय; मग तुम्हाला भरावा लागणारा इतका जीएसटी
- काही ठिकाणी सेनेचे गुंड उमेदवाराना दमदाटी व धमकी देत आहेत; निलेश राणेंचा आरोप
- बॉलिवूड ‘क्वीन’ कंगना होणार आता काश्मीरची ‘राणी’