देशातून घुसखोरांना आणि अवैध प्रवाशांना बाहेर काढणारचं – गृहमंत्री शहा

टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये इंचनइंच जमिनीवर राहणारे घुसखोर आणि अवैध प्रवासी यांची ओळख पटवली जाईल, घोसखोरांना आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे देशाबाहेर काढलं जाईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हंटले आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तरा दरम्यान शहा यांनी ही माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने देशातील घुसखोर आणि अवैध प्रवासी यांना बाहेर देशाबाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सरकार काम करत आहेत. आसाममध्ये लागू असलेला एनआरसी कायदा आसाम कराराचाच हिस्सा असल्याचं देखील शहा यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, काही भारतीयांना आजही भारतीय नागरिक मानलं गेलेलं नाही. अशा २५ लाख लोकांचे अर्ज राष्ट्रपती आणि सरकारकडे आले आहेत. नागरिकांनी केलेल्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागण्यात आला असल्याची माहिती शहा यांनी दिली आहे.