fbpx

दीपिका बनणार आई ? अखेर दीपिकाने केला खुलासा

टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या आगामी फिल्म छपाक (Chappak) मुळे चर्चेत आहे. एसिड सर्वाइवर लक्ष्मी ची दीपिका यात भूमिका बजावत आहे. दिल्लीमध्ये त्याचे शुटींग सध्या सुरु आहे. त्यानंतर दीपिका आई बनणार असल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले होते. याबद्दल तिचे चाहते खूप उत्सुक होते. परंतु नुकताच दीपिकाने तिच्या आई बनणार असल्याच्या बातमीवर खुलासा केला आहे.

गेल्या वर्षी दीपिकाने अभिनेता रणबीर सिंह याच्याशी विवाह केला. लग्नानंतर दीपिका प्रेग्नेंट असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या. परंतु दीपिकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ती प्रेग्नेंट नसल्याचे स्पष्ट केले आहे. या सर्व अफवा असून यामध्ये काही एक तथ्य नसल्याचे तिने म्हटले आहे. एवढेच नाही तर, महिलांवर आई बनण्यासाठी दबाव टाकणे चुकीचे आहे, ज्या दिवशी महिलांना आई बनण्यावर प्रश्न विचारणे बंद केले जातील तेव्हा आपण समजात काहीतरी बदल घडवू शकतो असे मत देखील तिने व्यक्त केले.