Share

Deepali Sayyed | दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार? म्हणाल्या, “लवकरच माझा…”

 Deepali Sayyed | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षातील काही आमदार आणि खासदारांना आपल्यासोबत घेत भाजप(BJP) पक्षासोबत युती केली, आणि राज्यामध्ये सरकार स्थापन केलं. यामुळे शिवसेना पक्ष संपूर्णपणे कोलमडून गेला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केवळ हाताच्या बोटाइतकेच नेते राहिले असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर ठाकरे गटातील उरलेले नेतेही शिंदे गटात सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच दीपाली सय्यद (Deepali Sayyed) या शिंदे गटात जाणार?, याबाबतच्या अनेक चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.

काय म्हणाल्या दीपाली सय्यद (Deepali Sayyed)

दीपाली सय्यद यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आहात का?, असा सवाल करण्यात आला. त्यावर मी ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि त्याआधीही दीपाली सय्यद प्रचंड सक्रीय झाल्याचं चित्र दिसत होतं. पण पक्षात सुषमा अंधारे (Sudhma Andhare) यांचा प्रवेश झाल्यापासून दीपाली सय्यद फारशा सक्रीय झालेल्या दिसत नसल्याचं बोललं जात आहे. यावर त्या म्हणाल्या,मी स्क्रीनवर येऊन तू-तू मै-मै करत नाही. जेव्हा गरज होती तेव्हा मी केली.

सुषमाताई नुकत्याच शिवसेनेत आल्या असून त्यांना आपण शिवसेनेत आल्याचं आणि आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. शिवसेनेत काम करताना मला आता साडे तीन वर्षं झाली आहेत. स्क्रीनवर येऊन टिप्पणी केली, कुरघोड्या केल्या तरच तुम्ही राजकारणात सक्रीय आहात असा समज करण्याची गरज नाही. मी कामंही केली पाहिजेत. जी लोक कामं करतात त्यांना पाठिंबा दिला तरच ती पूर्ण होतात, असं सय्यद यांना सांगितलं. पुढे बोलताना त्या असंही म्हणाल्या, प्रत्येकजण आपापली मतं मांडत आहेत. प्रत्येकाने आपला गट निर्माण केला आहे. लवकरच माझाही गट दिसेल.

ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्यासाठीही दीपाली सय्यद प्रयत्न करत होत्या. त्यावर बोलताना सय्यद म्हणाल्या, दोघे एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती आणि त्यासाठी मी वाट पाहत होती. एकत्र आले तर आपलं बळ वाढेल असं मला वाटत होतं. कार्यकर्त्यांवर या गोष्टीचा फार परिणाम होत आहे. जे कार्यकर्त्यांसोबत काम करतात त्यांनाच हे जाणवतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

 Deepali Sayyed | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षातील काही आमदार आणि खासदारांना आपल्यासोबत घेत भाजप(BJP) पक्षासोबत …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now