दक्षिण मध्य मुंबईमधून लोकसभा लढवणार – रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र सुरु झाली आहे . याच पार्श्वभूमीवर लोकसभा लढविण्याची इच्छा रिपब्लीकन पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई येथे व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी दक्षिण मध्य मुंबईची जागा रिपल्बीकन पक्षाला देण्यात यावी असा आग्रह धरला आहे. यावेळी राज्यात भाजप-शिवसेनेची युती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी मुख्यमंत्र्यांकडे दक्षिणमध्य मुंबईतील जागेबाबत बोललो आहे,तसेच आता उद्धव ठाकरेंशी ही बोलणार असल्याचे आठवले यांनी म्हटले.

Loading...

वंचितांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जाऊन त्यांना सत्ता मिळणार नाही, वंचितांना सत्ता हवी असल्यास त्यांनी माझ्यासोबत यावे, असे म्हणत आठवलेंनी वंचित बहुजन आघाडीला टोला लगावला. तसेच वंचित आघाडीच्या मतांचा फायदा महायुतीलाच होईल, असे ते बोले . मी लोकसभेत जाणार, मग पवारसाहेब एकटे राज्यसभेत कसे ? असे म्हणत शरद पवारांच्या लोकसभा निवडणूक लढविण्यासंदर्भातील बातम्यामुळे आपणास आनंद होत आहे आणि त्यांना निवडणूक लढवण्यास शुभेच्छा देतो असे ते म्हणाले.Loading…


Loading…

Loading...