समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार – शरद पवार

मुंबई – लोकसभा, आणि विधासभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असून, सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक काँग्रेससह इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्यात येईल. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

Rohan Deshmukh

पवार यावेळी बोलताना म्हणाले की, आघाडी बाबत सर्व समविचारी पक्षांशी बोलणं झालं आहे . त्यामुळे जागा वाटपामध्ये अडचण येणार नाही, काँग्रेससह इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढण्यात येतील.ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षाची निवड करण्याबाबत पक्ष कार्यालयात झालेल्या पदाधिकाऱ्यां बैठकीनंतर बोलत होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की ,या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहिले असते तर बरे झाले असते, भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यावर कार्यकर्त्यांना भेटले. कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्याबाबत कोर्टाचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी माझ्यासह राज्यातील जनतेला खरा आनंद होईल. पहिल्या टप्प्यात यश आले आहे. दुसऱ्या टप्प्यातही यश मिळेल, अशी आशाही पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...