महाविद्यालयेही सुरु होणार ? उदय सामंत यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : देशासह संपूर्ण जगभरात गेल्यावर्षीपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. मार्चमध्ये देशात कोरोनाचा कहर वाढू लागल्याने टाळेबंदी करण्यात आली होती. याकाळात शाळा व महाविद्यालये देखील बंद असल्याने शैक्षणिक क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. यानंतर ऑनलाईन पद्धतीने हे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात आले होते मात्र अनेक सोयीसुविधांअभावी विद्यार्थ्यांना त्यास मुकावं लागत असल्याचं समोर आलं आहे.

९ वी ते १२ वी या वर्गांच्या शाळा सुरु झाल्यानंतर उच्च शिक्षणाशी व विद्यापीठांशी निगडित महाविद्यालये देखील सुरु करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या होत्या. युजीसी म्हणजेच विद्यापिठ अनुदान आयोगाने महाविद्यालये सुरु करण्याबाबतच्या नियमावली जाहीर केल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालये नेमक्या कधी सुरु होणार याबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केलं आहे.

येत्या 20 जानेवारीपर्यंत 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील विद्यापीठांतर्गत येणारे महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून घेण्यात येईल असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज जाहीर केले आहे. तर, 50 टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठातील वसतिगृहे, स्थानिक परिस्थिती यांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या