कॅप्टन कुल आज करणार निवृत्तीची घोषणा ?

टीम महाराष्ट्र देशा : भारताचा माजी कर्णधार आणि लोकप्रिय खेळाडू एम. एस. धोनी आज ७ वाजता निवृत्त होणार असल्याची बातमी समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. एम. एस. धोनी हा पूर्ण निवृत्ती जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ही माहिती खरी आहे की खोटी याबाबत शंका आहे. कारण सध्याचा कर्णधार विराट कोहली याने याबाबतचे ट्विट केले असल्याचे सांगितले जात आहे.

कॅप्टन कोहलीनं एक भावनिक फोटो शेअर करून धोनीचे आभार मानले आहेत. तर त्यावर एक मजकूर लिहिला आहे. या फोटोत तो धोनीपुढे झुकून त्याचा सन्मान करत असल्याचं दिसतंय. या माणसाने त्या दिवशी मला असं काही धावायला लावलं होतं की मी फिटनेस टेस्ट देत होतो जणू… स्पेशल नाईट… त्या दिवशीचा खेळ मी कधीच विसरणार नाही!, असे विराटने लिहिले आहे.

दरम्यान गेले अनेक दिवस एमएस धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र यावर कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र धोनीने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण वन डे आणि टी20 क्रिकेट धोनी खेळतो आहे. आता या दोन प्रकारांतूनही निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे.