पाकिस्तानला जाणारे पाणी भारत रोखणार

पाकिस्तानला आगामी काळात मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो

टीम महाराष्ट्र देशा- रोज भारतीय जवानांवर भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला आगामी काळात मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो कारण मोदी सरकारकडून लवकरच उत्तराखंडमधील तीन नद्यांवर धरणे बांधून पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्यात येणार आहे. ही योजना सध्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते मंगळवारी हरियाणाच्या रोहतक येथील कृषी मेळाव्यात बोलत होते.

काय म्हणाले गडकरी ?

उत्तराखंडमधून वाहणाऱ्या या तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला द्यायचे की नाही, हा वेगळाच मुद्दा आहे. परंतु, सध्या आपल्या विकासासाठी गरजेचे असलेले या नद्यांतील पाणीही पाकिस्तानात जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे पाणी धरणांद्वारे रोखून ते पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये वळवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे उत्त्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. आम्हाला हे उद्दिष्ट काही करून साध्य करायचे आहे. त्यामुळे या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढण्यास निश्चितपणे मदत होईल

You might also like
Comments
Loading...