शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता लागला राष्ट्रवादीच्या गळाला ?

टीम महाराष्ट्र देशा :  शिवसेनेचे सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबनराव साळगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती राजकीय गोटातून समोर येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार थेट बबनरावांच्या संपर्कात असल्याचे समोर येत असून शिवसेनेला आणि राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. लवकरच बबनरावांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

बबनराव साळगावकर यांनी जर राष्ट्रवादीत प्रवेश केला तर सावंतवाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांना त्यांच्याच खंद्या समर्थकाकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे. परिणामी सावंतवाडीची विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची आणि लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आता साळगावकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश कधी होणार, याची उत्सुकता लागली आहे. येत्या काही दिवसांत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.Loading…
Loading...