खासदार संजय काकडेंना खुलासा मागणार – रावसाहेब दानवे

ravbsaheb danve and sanajy kakde bjp

टीम महाराष्ट्र देशा: खासदार संजय काकडे हे भाजपचे खासदार नसून सहयोगी असल्याचे म्हणत त्यांनी केलेल्या विधानावर खुलासा मागितला जाणार असल्याच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितल आहे. यावरूनच आता गुजरातमध्ये भाजपचा विजय अवघड असल्याच विधान संजय काकडेंच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत.

गुजरात निवडणुकांत भाजपला विजय अवघड असल्याच भाकीत काकडे यांनी वर्तवले होते. त्यानंतर काल युटर्न घेत आपले भाकीत खरेच ठरले असून मोदींचा करिष्मा चालला तरच भाजप विजयी होईल हेही आपण सांगितले असल्याच ते म्हणाले, तसेच गुजरातचा विजय हा भाजपचा नसून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असल्याचही सांगायला ते विसरले नाहीत. आधीच पुण्यामध्ये काकडेंच्या विरोधात भाजपमध्ये असणारी धुसफूस, त्यातच गुजरातचे भाकीत यावरून आता पक्षांतर्गत विरोधक त्यांना घेरण्यासाठी प्रयत्न करत असल्याच दिसत आहे.