‘भाजपमधील महिला कलाकारांबाबत असेच बोलणार का?’; प्रिया बेर्डे यांचा दरेकरांना सवाल

priyaa barde

मुंबई : भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून आता त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. शिरुरमध्ये प्रवीण दरेकर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान दरेकर बोलता बोलता भलतंच बोलून गेले. राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दरेकर यांच्यावर हल्लाबोल केला असून माफी मागितली नाही तर गाल लाल करण्यात येईल असा आक्रमक इशारा देखील देण्यात येत आहे. यावर आता अभिनेत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या प्रिया बेर्डे यांनीही भाजपवर टीका केली आहे.

प्रिया बेर्डे म्हणल्या की,  “पक्षाचे नाव घेऊन ते जर रंगलेल्या गालांचे मुके घेणारे राष्ट्रवादी हा पक्ष आहे. तर मग आणखी काय समजायचं? इतर कोणताही पक्ष असू दे, भाजपमध्येही हेमा मालिनी, स्मृती इराणी, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील दिग्गज कलाकार आहेत. मग तुम्ही सर्वच महिलांच्या बाबत असे बोलणार आहात का?”, असा सवाल प्रिया बेर्डे यांनी दरेकरांना केला आहे.

तर पुढे त्यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. “चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे उत्तम वक्ते आहेत. त्यांनी आपल्या नेत्यांना तारतम्य बाळगण्यासं सांगावं असा सल्ला मी देणार होते. मात्र त्यांनीच जर अशा नेतांची पाठराखण केल्याने मला फार वाईट वाटत आहे,” अशी टीकाही प्रिया बेर्डे यांनी यावेळी केली.

‘कोरोना काळात तुम्ही आमच्या तोंडाचे रंग बघून, टीव्ही बघूनच तुम्ही मनोरंजन करत होतात आणि तुम्ही आता जर याबद्दल बोलत असला तर याचा निषेध करावा वाटतो. नृत्य कलावंत, लावणी करणाऱ्या स्त्रिया या अंगभर कपडे घालतात, ते तुम्हाला वावडं वाटतं, ही मानसिकता कधी बदलेल मला काहीही माहिती नाही,’ असे म्हणत प्रिया बेर्डे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या