अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार ? ईडीचा काटोल आणि वडविहिरातील निवासस्थानी छापा

anil deshmukh

नागपूर : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप लावला होता. परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणी अनिल देशमुख यांच्या दोन्ही खासगी सचिवांना अटक केली आहे.

तर, अनिल देशमुख यांच्या विविध मालमत्तांवर ईडीची छापेमारी अजून सुरूच आहे. नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील देशमुखांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकले आहेत. आज सकाळपासूनच ईडीने छापेमारीला सुरुवात केली असून अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. या घरांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांची सर्च मोहीम सुरु आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कोट्यवधीच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे. तर आजच्या बाजारभावानुसार या मालमत्तेची किंमत तब्बल 350 कोटी रुपये इतकी असल्याच एका वृत्तवाहिनीने म्हटलं आहे. दरम्यान, ईडीने अनिल देशमुख यांच्या मुलासह पत्नीला देखील ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, यापैकी कोणीही अद्याप ईडी चौकशीसाठी हजर राहिलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IMP