अक्षयकुमार लवकरच मराठी सिनेमात पदार्पण करण्यासाठी उत्सुक

 टीम महाराष्ट्र देशा : एका पाठोपाठ एक बॉलिवूडमधील कलाकार मराठी चित्रपटात येता आहेत. काही दिवसांपूर्वी जाॅन अब्राहमने देखील ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे. यानंतर आता बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार प्रस्तुत करत असलेला पहिला मराठी चित्रपट ‘चुंबक’चा सध्या बोलबाला असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारने ट्विटरच्या माध्यमातून हा ट्रेलर शेअर केला आहे.

Loading...

या चित्रपटानिमित्त पार पडलेल्या एका कार्यक्रमात अक्षयने मराठी चित्रपटात भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली. एखादी चांगली पटकथा मिळाली की मराठी चित्रपटात भूमिका नक्की साकारेन, असं अक्षय म्हणाला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटांचा मी खूप मोठा चाहता असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं. मला ‘बालक पालक’ आणि ‘लय भारी’ हे चित्रपट खूप आवडले. दिवंगत दादा कोंडके यांच्या चरित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही केला होता. पण पटकथा मनासारखी जुळून आली नाही आणि तो प्रयत्न सोडून देण्याचा मी निर्णय घेतला.’ असं तो म्हणाला.

‘चुंबक’ यातील प्रसन्ना ठोंबरे ही व्यक्तिरेखा दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे ख्यातनाम गीतकार, गायक, संगीतकार आणि लेखक स्वानंद किरकिरे यांनी साकारली आहे. डिस्को आणि बाळू या दोघांच्या फसवणुकीला प्रसन्ना नाहक बळी पडतो. मात्र जेव्हा भोळ्याभाबड्या प्रसन्नाला त्यांचा खरा चेहरा समजतो, तेव्हा कथेला वळण येते. स्वानंद अगदी पहिल्यांदाच चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारात आहेत.

या चित्रपटात स्वानंद किरकिरे आणि दोन नवोदित कलाकार संग्राम देसाई आणि साहिल जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती अरुणा भाटीया आणि नरेन कुमार करत आहेत. ‘चुंबक’ २७ जुलै २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. चुंबकचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी यांनी केले असून चित्रपटाचे लेखन त्यांनी सौरभ भावे यांनी केले आहे.

पालखीच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज

 Loading…


Loading…

Loading...