बाळासाहेबांच्या स्मारकासाठी प्रियदर्शनीतील ५ हजार झाडांचा बळी जाणार का ?

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेची सत्ता सलेल्या औरंगाबाद पालिकेचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. राज्यात शिवसेनेचे सरकार येताच शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी औरंगाबाद येथील प्रियदर्शनी उद्यानातील ५ हजार झाडे जाळली जात आहेत. त्यामुळे मुंबईतील आरे कॉलनीतील मेट्रोच्या कार शेड प्रकरणी आक्रमक असलेली शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत का ? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी विचारला आहे.

औरंगाबाद शहरातील प्रियदर्शनी उद्यान हे पर्यावरणप्रेमींचं आवडतं ठिकाण आहे. शहरातील सर्वात शुद्ध हवा इथे आहे. शहरातील लोक या उद्यानाला ऑक्सिजन हब म्हणतात. 70 हून जास्त प्रजातींचे पक्षी, 40 प्रकारची फुलपाखरं, सरपटणारे जीव आणि आकाशाला स्पर्श करु इच्छिणारी उंचच उंच झाडं या उद्यानात आहेत. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी परिसरातील झाडं आणि जैवविविधता धोक्यात आली आहे. तसेच आज दिसतंय ते या उद्यानाचं निम्मं राहिलेलं वैभव आहे. या उद्यानाची जागा सिडकोकडून मनपाच्या ताब्यात आली आणि त्यानंतर या उद्यानातील 443 झाडं प्रस्तावीत आहेत.

प्रियदर्शनी उद्यानात हे सगळं उभं करण्यासाठी किमान पाच हजार झाडं तोडावी लागतील, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. या मनमानीविरुद्ध पर्यावरण प्रेमींनी आवाज उठवला आहे. ग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातून सकारात्मक आंदोलन सुरु झालं आहे. सहा वर्षांच्या मुलांपासून ते साठीतले आजोबाही झाडं वाचवण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, उन्हाळ्यात उद्यान विभागाच्या कृपेनं भर झाडं पाण्याअभावी मरत होती. हे पाहून पर्यावरणप्रेमींनी वॉक अँड वॉटर (#WalkAndWater) हा अभिनव उपक्रम राबवत अनेक झाडं वाचवली.

स्थानिक लोकांनी, पर्यावरण प्रेमींनी भर उन्हाळ्यात स्वतः पाणी घालून झाडं वाचवली, पावसाळ्यात लहान-मोठे बांधारे बांधले, स्वच्छता केली तरिही पालिकेला पाझर फुटला नाहीच. याऊलट पालिकेने हे उद्यान दारुडे, गर्दुल्ले, नशेखोरांच्या हवाली केलं आहे. लोकांनी वर्गणी काढून दुरुस्त केलेले उद्यानाचे कुंपण गर्दुल्ल्यांनी तोडलं आहे. अशी खंतही पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. आता आरे प्रकरणी आक्रमक असलेली शिवसेना प्रय्दर्शनी उद्यानाबाबत काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :