WhatsApp: संदर्भात विकिलिक्सचा खळबळजनक खुलासा

अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीकडून (सीआयए) नागरिकांचे व्हॉटसअॅप मेसेज हॅक केले जात आहे, असा  खळबळजनक खुलासा विकिलिक्सने केला असून यासंदर्भातील काही कागदपत्रे विकिलिक्सने प्रसिद्ध केली आहेत. मात्र, याबद्दल अजूनही कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.
दरम्यान, विकिलिक्सने या घटनेमुळे पुन्हा एकदा अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा भेदून माहिती बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. मात्र, यानिमित्ताने सीआयएकडून अमेरिकन नागरिकांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विकिलिक्सच्या कागदपत्रांमध्ये म्हटल्याप्रमाणे सीआयए एखाद्याचे व्हॉटसअॅपचे सांकेतिक प्रणालीत शिरकाव करून त्याचे मेसेज वाचू शकते. हे करताना सीआयए त्या व्यक्तीचे व्हॉटसअॅप अकाऊंट नव्हे तर स्मार्टफोनच हॅक करते. ही खूप गंभीर समस्या असल्याचे एडवर्ड स्नोडेन याने म्हटले आहे.