ओखी चक्रीवादळ : मुंबईकरांसाठी रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज

मुंबई  : ‘ओखी’ चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता मध्य रेल्वेने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था केली आहे. तसेच प्रशासनाने वाहनांची व्यवस्थादेखील केली आहे. संकटकाळी प्रवाशांची गर्दी नियंत्रणात येण्यासाठी विशेष २५० रेल्वे पोलीस तसेच महाराष्ट्र पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

सीएसटी आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन कक्ष उभारण्यात आले आहेत. त्याठिकाणी सर्वप्रकारची मदत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्याकरता आपत्ककालीन संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत.