‘शहा, गडकरी, केजरीवाल यांच्या पत्नी राहुल, सोनिया, मोदींना शिव्या देत नाही’ : शिवसेना

टीम महाराष्ट्र देशा – राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरा असं पत्र शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना लिहिलं आहे. अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती.

आदित्य ठाकरे यांचा जो उल्लेख अमृता फडणवीस यांनी केला होता. त्याचा निषेध करत किशोर तिवारी यांनी हे पत्र लिहिलं आहे.यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही आवरावं अशी विनंती केली आहे. त्यामुळे संघ आता काय भूमिका घेतंय हे बघणं महत्वाचं आहे.

Loading...

काल ट्विटरवरून अमृता फडणवीस यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तसेच राज्यातील भाजप आणि शिवसेना यांचा काडीमोड होऊन महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून त्या शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि पक्षावर टीका करत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष आणखीनच दुरावले आहेत असंही तिवारी म्हणाले.

तसेच शहा, गडकरी, केजरीवाल यांच्या पत्नी राहुल, सोनिया, मोदींना शिव्या देत नाही . त्यामुळे अमृता फडणवीस यांनीही राजकीय भाष्य टाळावे. अमृतायाचं राजकीय वक्तव्य हे भाजपच्या राजकीय संस्कृतीला धरून देत नाही. असे म्हणत त्यांनी सुषमा स्वराज , स्मृती इराणी यांच्या पतींचही त्यांनी या पत्रात उदाहरण दिलं आहे. त्यांनी कधीही राजकीय भाष्य केल नसल्याचं तिवारींनी म्हटलं आहे

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती