fbpx

त्रासाला कंटाळून पत्नीनेच केली पतीची हत्‍या

crime-1

रायगड : पतीमुळे होणा-या त्रासाला कंटाळून पत्‍नीनेच पतीची हत्या केल्याची घटना अलिबाग तालुक्‍यातील थळ कोळीवाडा परिसरात घडली. यमुना कोळी असे या महिलेचे नाव आहे. यमुना हिने स्‍वतः गुन्‍ह्याची कबुली दिल्‍यानंतर याबाबत माहिती मिळाली. याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे.

यमुना ही पती हरिश्‍चंद्र कोळी आणि मुलांबरोबर अलिबाग तालुक्‍यातील थळ कोळीवाडा परिसरात वास्तव्यास होती. हरिश्‍चंद्र हा दारुकरिता लागणा-या पैशांसाठी यमुनाला सतत त्रास देत होता. यामुळे यमुना वैतागली होती. भाऊबीजेच्या दिवशी २१ ऑक्टोबर रोजी रात्री घरातून गायब झालेल्‍या ७० हजार रूपयावरून दोघांमध्‍ये वाद झाले. यावेळी त्यांच्यात झालेल्या हाणामारीत हरिश्‍चंद्र जखमी झाला. ही संधी साधत यमुनाने साडीचा फास त्‍याच्‍या गळ्याभोवती आवळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने स्वत: खड्डा खणून त्याचा मृतदेह पुरला. मात्र दोन दिवसांनी तिला पश्चाताप झाल्यामुळे तिने पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना  दिली.