विराटच्या निर्णयाला पत्नी अनुष्काचा पाठिंबा; पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया…

virat

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू व संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारताच्या टी 20 कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचे टी 20 कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेवर पडदा पडला आहे. विराट कोहलीने ट्विटरवरून टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर T20 टीमचे कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती दिली.

विराट कोहलीने T20 विश्वचषक स्पर्धा तोंडावर आलेली असताना कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केलं आणि क्रिकेट जगतात खळबळ उडाली. विराटने स्वतःला थोडी स्पेस देऊ इच्छित असल्याचं सांगत T20 टीमचं कर्णधारपद सोडणार असल्याचं स्पष्ट केलं.

अचानक विराटने घेतलेल्या या निर्णयावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. तसेच विराटच्या या निर्णयानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. विराटच्या या निर्णयानंतर पत्नी अनुष्का शर्मानेही या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.

अनुष्कानं विराटच्या या निर्णयावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं विराटची कॅप्टनसी सोडण्याची पोस्ट शेअर करत लव्हचा इमोजी शेअर केला आहे. विराटचा हा निर्णय आपल्याला आवडला असून त्याला पूर्ण पाठिंबा असल्याचं अनुष्कानं यामधून जाहीर केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या