सोशल मिडीयावर #WhyModiAgain चा ट्रेंड !

blank

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रविवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यात जनताही आपले मत मांडण्यात कुठेच कमी पडत नाही. आणि व्यक्त होण्यासाठी आजच्या काळात सर्वात जास्त सोशल मिडीयाचा वापर होताना आपल्याला पाहायला मिळतो  प्रामुख्याने तरुणाई सोशल मिडीयावर भरभरून व्यक्त होताना दिसते. सध्या ट्वीटरवरती #WhyModiAgain चा ट्रेंड सुरु आहे.

यामध्ये अनेकांनी या हॅशटॅग चा वापर करत मोदी सरकार पुन्हा का निवडूण यायला हवे याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. याचबरोबर कॉंग्रेसच्या आणि भाजपा च्या काळात कोणत्या गोष्टी बदलल्या याचाही अनेकांनी उल्लेख केला आहे. अनेकांनी मिम्स चा वापर केला आहे तर, काहींनी व्हिडिओ च्या माध्यमातून मोदि सरकार पुन्हा का यायला हवे याबद्दल मत मांडली आहेत. प्रामुख्याने बर्याच जणांनी सर्जीकल स्ट्राईक चे उदाहरण देत मोदि सरकारची वाहवा केली आहे.

देशासाठी योग्य ते निर्णय घेणे आणि लोकांच्या अडचणी सोडविणे  हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे काम असते. त्यासाठीच लोकांनी त्यांना निवडूण दिलेले असते. निवडणुका जवळ आल्या की, एकमेकांवर टीका करत, देशातील समस्यांना केंद्रस्थानी ठेवून जनतेला मोठमोठी आश्वासने दिली जातात. यावेळी मात्र दहशतवाद, भारतीय सैन्य आणि म या मुद्यांवरती देशभर चर्चा होताना दिसून येत आहे.