मागील ३ ते ४ वर्षांपासूनचं काहीजणांना ‘खुजली’ होत आहे-अनुपम खेर

तर मग ५२ सेकंद राष्ट्रगीतासाठी उभे राहू शकत नाही का’?-खेर

पुणे – ‘देशात शांतता पाहून गेली ३ ते ४ वर्षांपासून काहीजणांना खुजली होत आहे यातूनच राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याला विरोध आदी मुद्दे उकरून काढून वातावरण गढूळ करण्याचे प्रकार सुरु आहेत मात्र जर आपण शाहरूखच्या सिनेमाच्या तिकिटासाठी रांगेत थांबतो, मॅचच्या तिकिटासाठी रांगेत थांबतो, हॉटेलमध्ये जागा मिळण्यासाठी थांबतो. मग ५२ सेकंद राष्ट्रगीतासाठी उभे राहू शकत नाही का’? असा परखड सवाल जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी उपस्थित केला आहे .ते पुण्यात बोलत होते.

मुक्तछंद संस्थेतर्फे अनुपम खेर आणि तलाकपीडित महिलांच्या न्यायासाठी यशस्वी लढा देणाऱ्या शायरा बानो यांना मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रमोदजी महाजन स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार पूनम महाजन, डॉ. नाहीद शेख संस्थेच्या अध्यक्ष आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. नाहीद शेख या वेळी उपस्थित होत्या. कमोडोर सुरेश पाटणकर यांनी ‘ओआरओपी’च्या (एक पद एक निवृत्तिवेतन) माध्यमातूम मिळालेल्या निधीपकी ७० हजार रूपयांचा धनादेश राज्य सरकारच्या मदतनिधीसाठी जावडेकर आणि बापट यांच्याकडे सुपूर्द केला.

bagdure

अनुपम खेर यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
जर आपण शाहरूखच्या सिनेमाच्या तिकिटासाठी रांगेत थांबतो, मॅचच्या तिकिटासाठी रांगेत थांबतो, हॉटेलमध्ये जागा मिळण्यासाठी थांबतो. मग ५२ सेकंद राष्ट्रगीतासाठी उभे राहू शकत नाही का’?

‘आपल्या पासपोर्टवर धर्म नव्हे, तर राष्ट्रीयत्व लिहिलेले असते. मी देशाला माझा मोठा भाऊ मानतो. देशाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. माझ्या वडिलांनीच माझ्या मनातून भीती कायमची काढून टाकली आहे. त्यामुळे पुरस्कार परत करणारे मला काय घाबरवणार,’ असे खेर म्हणाले. ‘शायरा बानो यांनी आपल्या लढ्यातून महिलांना बळ व सन्मान दिला,’ असेही ते म्हणाले.

 

You might also like
Comments
Loading...