का साजरा करतात एप्रिल फुल डे ?

टीम महाराष्ट्र देशा : आज १ एप्रिल. जगभरात हा दिवस एप्रिल फुल डे म्हणून साजरा केला जातो. आपल्या मित्रमैत्रीण, नातेवाईकांना एवढेच काय तर अनोळख्या व्यक्तीला देखील वेड्यात काढून मजा घेतली जाते. परंतु १ एप्रिललाच हा दिवस सेलिब्रेट का केला जातो हे अनेकांना माहित नाही. १३९२पासून हा दिवस साजरा केला जातो.

आजच का सेलिब्रेट करतात एप्रिल फुल डे ?

फ्रान्समधून हा दिवस साजरा करण्याची सुरूवात झाली. पॉप ग्रेगरी १३ यांनी १५८२ यांनी प्रत्येक युरोपियन देशाला ज्यूलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश दिले. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे हे १ एप्रिलपासून नाही तर १ जानेवारीपासून सुरू होतं. अनेक लोकांनी हे मानण्यास नकार दिला तर काहींना याबद्दल माहितीही नव्हती. यामुळे ते नववर्ष १ एप्रिललाच साजरे करतात. अशांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले. यादिवशी प्रॅंक करून एकमेकांना मुर्ख बनवू लागले. आणि मग काय बघता बघता ही प्रथा युरोपमध्ये पसरली.

एप्रिल फूलचं सर्वात लोकप्रिय प्रॅंक एखाद्या पाठीवर कागदाचा मासा किंवा स्टीकर चिटकवणे आहे. याला एप्रिल फिश असंही म्हटलं जातं. पहिल्या मुर्ख दिवसाचा रेकॉर्ड १३९२ मध्ये आढळला होता तेव्हापासून हा दिवस साजरा केला जात असल्याचा अंदाज आहे. काही देशांमध्ये एप्रिल फूलच्या गमती-जमती केवळ दुपारपर्यंतच केल्या जातात. स्कॉटलॅंडमध्ये लोक दोन दिवस मुर्ख दिवस साजरा करतात. दुसऱ्या दिवसाला इथे ‘टेली डे’ म्हटले जाते.