म्हणून केली तुकाराम मुंडेंची बदली; मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

पुणे : पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांची अवघ्या १० महिन्यांमध्ये बदली करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. तसेच प्रशासनाला जरब बसवणारे आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बदली करण्याच्या परंपरेची पुनरावृत्ती भाजप सरकारने केल्याची टीका यावेळी करण्यात आली. यानंतर आता तुकाराम मुंडे यांची नेमकी बदली का करण्यात आली याचा खुलासा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सिम्बायोसिस लॉ स्कूल तर्फे आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या एका प्राध्यापकाने तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याची दहाच महिन्यात बदली का करण्यात आली? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की,

केवळ पुण्यालाच चांगल्या अधिकाऱ्यांची गरज नाही, इतर शहरांनाही चांगले अधिकारी हवेत, त्यामुळे मुंडे यांची नाशिकला बदली केली आहे. तुकाराम मुंडे हे पुणे महापालिका अंतर्गत पीएमपीचा कारभार पाहत होते, आता ते नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.Loading…
Loading...