मराठा समाजाच्या बाबतीतच नेहमी असे का घडते, विनायक मेटेंचा संतापजनक सवाल

टीम महाराष्ट्र देशा : शासनाच्या विविध विभागाच्या परीक्षांत उत्तीर्ण होऊनही मराठा समाजातील साडेतीन हजार उमेदवारांना तीन वर्षांपासून नियुक्त्या मिळाल्या नाहीत. आता या उमेदवारांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले आहे. मराठा समाजाच्या बाबतीतच नेहमी असे का घडते, असा सवाल शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.

यावेळी बोलताना विनायक मेटे म्हणाले, ‘प्रत्येक सरकार मराठा समाजातील मुलामुलींसाठी फक्त जागा भरण्याच्या घोषणा करत आले आहे. या बाबींचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. मराठा समाजाच्या बाबतीतच नेहमी असे का घडते, अशी संतप्त प्रतिक्रिया मेटे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने वेळ न दवडता ताबडतोब या उमेदवारांसोबत बैठक घेऊन नियुक्त्या द्याव्यात, आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करत त्यांना निलंबित करावे, अशी मागणी मेटे यांनी केली.

Loading...

तसेच ‘ आधीच्या सरकारमधील काही शुक्राचार्यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून या नियुक्त्या अद्याप दिल्या नाहीत, असा आरोप मेटे यांनी केला. या मागणीला आझाद मैदान ते विधिमंडळापर्यंत लावून धरण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. ही बाब अत्यंत संतापजनक आहे. असे सातत्याने मराठा समाजाच्या बाबतीतच का घडते असा सवालही करत प्रत्येक सरकार मराठा समाजातील मुलामुलींसाठी ह्या त्या जागा भरू अशा फक्त घोषणा करते. मुख्यमंत्र्यांनी वेळ न दवडता या उमेदवारांची बैठक घेऊन त्यांना नियुक्ती आदेश देऊन रुजू करुन घ्यावे अशी मागणीही त्यांनी केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?