अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घाईघाईने निर्णय घेण्याची गरज का भासली?

0Dhananjay_Munde_0

मुंबई – मुख्य सचिवांची सप्टेंबरपर्यंत मुदत असताना आचारसंहितेदरम्यान घाईघाईने निर्णय घेण्याची गरज का भासली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी करत सरकारला धारेवर धरलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना हवी तशी मदत करता येत नाही. असं, अप्रत्यक्षपणे सरकारच सांगत आहे. मात्र दुसरीकडे सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. नेमकी काय गौडबंगाल आहे? असा आक्षेप धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे.