राम मंदिरासाठी वटहुकूम काढून दाखवाच;ओवैसींचे भाजपला आव्हान

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या खटल्याची पुढे ढकलल्यानंतर आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असुदुद्दीन ओवैसी यांनी आजच्या सुनावणीनंतर भाजप सरकारला थेट आव्हान दिले आहे. सरकारने राम मंदिराचा अध्यादेश काढून दाखवावाच, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मोदी सरकार अध्यादेश का काढत नाही, प्रत्येक वेळी ते अध्यादेश काढण्याची धमकी देत असतात, टॉम, डिक अँड हॅरी असलेल्या भाजपा, आरएसएस, विहिंप अशा धमक्या देत असतात. तुमच्याकडे सत्ता आहे. मी तुम्हाला आव्हान करतो की, अध्यादेश काढून दाखवा, असंही ओवैसी म्हणाले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वीही एमआयएमचे असदुद्दीनं ओवैसी यांनी राम मंदिराच्या वादावर टिपण्णी केली होती. राम मंदिर बांधण्यापासून कोण अडवतंय. त्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधून दाखवावं. भाजपाला देशात धार्मिक विविधता नको, त्यांना उदारमतवाद नको. भाजपाला देशात एकाधिकारशाही राबवयाची आहे. त्या पक्षाचा विविधता आणि कायद्यावर विश्वास नाही, असंही ओवैसी म्हणाले होते.

उद्धव ठाकरेंचा आयोध्या दौरा : खा. संजय राऊत यांनी राम मंदिर परिसराला दिली भेट

राम मंदिर प्रश्नावरून दिगंबर आखाडा भाजपविरोधात आंदोलन उभारण्याच्या तयारीत