परीक्षार्थींचा संताप आणि महापोर्टल मुळे सरकार पडले ?

blank

टीम महाराष्ट्र देशा : देवेंद्र फडणवीस सरकार २०१४ रोजी सत्तेत आलं. स्पर्धा परीक्षांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी फडणवीस सरकारने २०१७मध्ये महापोर्टल अस्तित्वात आणलं. वर्ग ३ आणि ४ च्या परीक्षांसाठी या पोर्टलचा वापर करण्यात येत होता. संकल्पना चांगली होती पण, अंमलबजावणीत कुठे तरी कमतरता पाहायला मिळाली. एक दोन दिवस चालणारी परीक्षा तब्बल २४ दिवस चालायला लागली. त्यामुळे कुठे तरी या पोर्टल विरोधात संशय निर्माण होऊ लागला. त्यात भरीस भर म्हणूम यातील भ्रष्टाचार देखील समोर येऊ लागला. कुठे तरी या पोर्टल विरोधात प्रश्न निर्माण होऊ लागला.

आपल्याकडे सरकारी नोकरी बद्दल एक विशेष आकर्षण असल्याने लाखो मुले-मुली दरवर्षी स्पर्धा परीक्षा देत असतात. मात्र कुठे तरी या पोर्टल मधला भ्रष्टाचार समोर येऊ लागल्याने सपर्धा परीक्षा करणाऱ्या याविद्यार्थ्यांमध्ये त्या विरोधात रोष निर्माण होऊ लागला. यासंदर्भात अनेक आंदोलने विद्यार्थ्यांनी केली. पण कुठल्याच स्तरावर त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आलं नाही, असा आरोप काही विद्यार्थी संघटना करीत आहेत.

२०१७च्या आधी या पोर्टल मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत होत्या. पण ही परीक्षा ऑनलाईन झाल्यापसून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत आहे. बऱ्याचदा साईट्स चा सर्व्हर डाऊन असतो, दर परीक्षेसाठी प्रत्येक वेळी नवीन प्रोफाइल बनवून तीच तीच माहिती पुन्हा पुन्हा भरावी लागते. तसेच ऑनलाईन परीक्षेमध्ये पैसे ही जास्त मोजावे लागत आहेत. कमीत कमी ३०० ते ५००रुपये प्रत्येक पोस्ट साठी भरावे लागत आहेत. तसेच यापरीक्षेचे सेंटर दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यातून फक्त एका तासाच्या परिक्षेकरिता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जावे लागते यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक दृष्ट्या सुद्धा हाल होत आहेत.

परीक्षा कधी होणार, किती दिवस चालणार याची कोणतीही सूचना पोर्टल कडून दिली जात नाही. मे २०१९ मध्ये MIDC, ZP या परीक्षेचे फॉर्म निघाले होते मात्र २०२० सुरू व्हायला आले तरी अजूनही या परिक्षांबद्दल कोणतेही नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले नाही. महापरिक्षा पोर्टल द्वारेच घेण्यात आलेल्या “पशुधन पर्यवेक्षक” या पदासाठीच्या या परीक्षेत अनुपस्थित असलेल्या उमेदवारांची नावे, पात्र उमेदवारांच्या यादीत होती यावरूनच या पोर्टलचा अनागोंदी कारभार सर्वांसमोर आलेला आहेत तरी याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत.

या सर्व त्रासाला कंटाळूनच महापोर्टल बंद करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार केली जात होती. पण सरकारने याबद्दल कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये याबद्दल रोष होता. याचा परिणाम निवडणुकीत झाला असल्याचं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या