टीम महाराष्ट्र देशा: शरीर, मन आणि डोकं या तिन्ही साठी झोप (Beauty Sleep) खूप महत्त्वाची असते. जर आपण व्यवस्थित झोप नाही घेतली तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर आणि सौंदर्यावर दिसायला लागतात. त्यामुळे व्यवस्थित झोप घेणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. तुम्हाला चांगली व्यवस्थित गाढ झोप लागते, तेव्हा मनाला आराम मिळून शरीर सुदृढ राहते. जेव्हा आपण व्यवस्थित झोप घेतो तेव्हा आपले सौंदर्य आणि शरीर दोन्हीही निरोगी राहते. त्यामुळे ब्युटी स्लिप ही खूप महत्त्वाची असते.
नक्की काय असते ब्युटी स्लिप (Beauty Sleep) ?
दररोज वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे आणि त्याचबरोबर 8 तासाची झोप पूर्ण करणे याला ब्युटीस्लिप असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीला दररोज 7 ते 8 तास झोपण्याचा सल्ला डॉक्टर ही देतात. हा सल्ला प्रामुख्याने 18 ते 58 वयोगटातील लोकांना दिला जातो. कारण वय वर्ष 58 नंतर माणसाला काही तासांची झोप लागते. पण वयात असताना तुम्ही योग्य आणि व्यवस्थित झोप घेतली तर तुमची त्वचा आणि शरीर निरोगी राहील. त्याचबरोबर तुमचे मानसिक आरोग्य देखील व्यवस्थित राहील.
ब्युटीस्लिप प्रमाणे ब्युटीनॅप देखील घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या दिनचर्येच्या कामाच्या वेळेत 15 ते 20 मिनिटे वेळ काढून डोळे मिटून हलकीशी डुलकी घेऊ शकतात. असे केल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटेल. यामध्ये मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर ब्युटीनॅप 20 ते 30 मिनिटांपेक्षा जास्त घेतल्यास तुमचे वजन वाढवू शकते.
ब्युटी स्लिपचे फायदे
- आपल्या शरीरातील पेशी झोपेतच सक्रिय असतात आणि त्यांची दुरुस्ती ही झोपेतच होते. त्यामुळे आपल्या पेशींना दुरुस्त ठेवण्यासाठी व्यवस्थित झोप घेणे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर व्यवस्थित झोप घेतल्यास आपल्या त्वचेवरची चमकही वाढू लागते.
- व्यवस्थित ब्युटी स्लिप घेतल्याने आपला मेंदू ताजतवाना राहून आपला मूड देखील चांगला राहतो. मेंदू ताजातवाना राहिल्यामुळे आपल्या शरीरातील डोपामाइन आणि सोरोटोनिन सारख्या आनंदी हार्मोन्सचा स्त्राव वाढतो. त्यामुळे त्वचा चमकदार होते आणि चेहऱ्यावरचे आकर्षणही वाढते.
- पुरेशी आणि व्यवस्थित झोप घेतल्याने शरीरावर सूज येण्याची समस्या कमी होते. त्याचबरोबर ब्युटी स्लिप घेतल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स आणि सुरकत्या देखील कमी होऊ शकता.
टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis । महाविकास आघाडी सरकारने दुर्लक्ष केलं, त्यामुळे हे उद्योग राज्याबाहेर गेले; फडणवीसांचा दावा
- Rose water benefits | चेहऱ्यावरील समस्या कमी करायच्या असेल तर ‘या’ पद्धतीने लावा गुलाबजल
- Raj Thackeray | जो तो प्रकल्प गुजरातला का जातो ; राज ठाकरेंच विधान!
- Bachchu Kadu | मी सरकारवर नाराज नाही, नाराजीला रवी राणा कारणीभूत – बच्चू कडू
- Ashish Shelar | माजले होते ते बोके कोरोना काळात खावून खोके ; आशिष शेलार यांची टीका