fbpx

रस्त्यावर बसच नाही… विद्यार्थ्यांनी कॉलेजला जायचं तरी कस ?

अंबड : अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयात ग्रामीण भागातील जवळपास 4 हजार विद्यार्थी दररोज ये जा करत आहेत, या साठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाड्या स्वतंत्र सोडल्या जातात परंतु मागच्या काही दिवसात बस वेळेवर येत नाही किंवा कधी कधी तर येतच नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड वाताहत होत आहे. याला कंटाळून आज विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच धरणा दिला.

येणाऱ्या-जाणाऱ्या बस अडवून धरल्या तेव्हा अंबड आगार प्रमुख म्हणाले की अंबड तालुक्यातील रस्ते खराब झालेले आहेत त्यामुळे त्यावर बस चालवणे शक्य नाही अपघाताची भीती असते आशा वेळी आम्ही बस सोडू शकत नाही.

तर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता विद्यार्थी म्हणतात की सध्याचे आमदाराच रस्त्यांच्या कामावर लक्ष देत नाहीत त्यामुळे आम्हाला कॉलेज ला येणे शक्य होत नसेल तर आमदार साहेबांनी यात लवकरात लक्ष घालून रस्त्याचे कामं मार्गी लावावेत, आमदार स्वतःच कॉलेजचे मालक असताना जर विद्यार्थ्यांना व त्यांच्या समस्यांना असं दुर्लक्षित करत असतील तर विद्यार्थी मोठा रास्ता रोको करणार आहेत.