Share

Morbi Bridge | मोरबी पूल दुर्घटनेत एवढे मृत्यू का झाले?, NDRF अधिकाऱ्याने सांगितलं कारण, म्हणाले…

Morbi Bridge | गांधीनगर :  गुजरात (Gujrat) येथील मोरबी पूल (Morbi Bridge) काही दिवसांपुर्वी कोसळला. या दुर्घटनेत १४० हून अधिक लोकांचा जीव गेला. एवढे जीव जाण्यामागचं कारण लोकांना कोड्यात टाकत असतानाच राष्ट्रीय आपत्ती दलाच्या प्रमुखांनी याबाबत उत्तर दिलं आहे. एनडीआरएफचे कमांडंट व्हीव्हीएन प्रसन्ना कुमार (Prasanna Kumar) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पुलाच्या दोन्ही बाजूला पाण्याची पातळी फक्त १० फूट इतकी आहे. यामुळे खाली पडल्यानतंर लोक दगडावर आपटले. इतक्या उंचीवरुन खाली पडल्याने त्याची तीव्रताही जास्त होती, अशी माहिती प्रसन्ना कुमार यांनी दिली आहे. मृतदेहांचा शोध घेण्यासाठी आम्ही कॅमेरा आणि सोनार उपकरण जोडण्यात आलेल्या अल्ट्रामॉडर्न रिमोट अंडरवॉटर वाहनाचा वापर करत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

नदीच्या तळाला सगळीकडे दगड आहेत. यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला असून, जखमी झाले आहेत, असं स्पष्टीकरण प्रसन्ना कुमार यांनी दिलं आहे. पुलावर 300-400 लोक उपस्थित होते. पूल तुटल्यानंतर काही लोकांनी पुलाचा भाग आणि दोरी घट्ट पकडून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.

दरम्यान, हा पूल सुमारे 7 महिन्यांपासून बंद होता. केबल ब्रिज बराच जुना असून नूतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वीच तो कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात येत आहे. नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुलावर उभे असलेले शेकडो लोक मच्छू नदीत पडले. मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी दुर्घटनेत आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाला आहे.

राजकोटचे भाजपा खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदारिया यांच्याही परिवारातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती खुद्द कुंदारिया यांनी दिली आहे. कुंडारिया यांच्या बहिणीच्या दिराच्या चार मुली आणि तीन जावई यांच्यासह पाच मुलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच कुंडारिया रविवारपासून मोरबीयेथेच तळ ठोकून बसले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Morbi Bridge | गांधीनगर :  गुजरात (Gujrat) येथील मोरबी पूल (Morbi Bridge) काही दिवसांपुर्वी कोसळला. या दुर्घटनेत १४० हून अधिक …

पुढे वाचा

Marathi News