देशभक्ती दाखवण्यासाठी चित्रपटगृहात उभे राहण्याची गरजचं काय ?:ओवेसी

616625-owaisi

टीम महाराष्ट्र देशा : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी चित्रपटगृहात राष्ट्रगीतावेळी उभे राहण्याची सक्ती न करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कोणाला देशभक्ती दाखवण्यासाठी चित्रपटगृहात उभे राहण्याची गरज नाही. चित्रपटगृहात देशभक्ती का दाखवयाची, असा सवाल करत कोण किती देशभक्त आहे, हे यावरून समजत नाही, असेही त्यांनी म्हटले.

कोणाला आपली देशभक्ती दाखवण्यासाठी चित्रपटगृहात उभे राहण्याची गरज नाही. कोण किती देशभक्त आहे, हे समजूच शकत नाही, असे त्यांनी म्हटले. तत्पूर्वी देशभक्ती सिद्ध करण्यासाठी नागरिकांना चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजवले जात असताना उभे राहण्याची गरज नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला होता. केंद्र सरकारला राष्ट्रगीत वाजवण्यासंबंधी नियम बदलायचे असतील तर ध्वजसंहिता बदलण्याचा विचार करावा, न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेम साधू नये, असा सल्लाही न्यायालयाने दिला होता.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...