fbpx

संजयमामांनी ‘या’ चुका टाळल्या असत्या तर माढ्यात कमळ फुलले नसते

टीम महाराष्ट्र देशा-  माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. सोलापुरातून भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज विजयी झाले. माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. माढ्यातून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा पराभव केला आहे.

संजय शिंदे याच्या पराभवाची काय आहेत कारणे जाणून घ्या…

  • माढा, करमाळा, सांगोला येथून राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांना मताधिक्य मिळाले. शिंदेंना त्यांच्या माढा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात भ्रमनिरास झाला. भाजपने शिंदे व राष्ट्रवादी विरोधी गटास एकत्र केल्याने शिंदेंना फक्त साडेसहा हजारांचे मताधिक्य मिळाले.
  • ही निवडणूक मोहिते-पाटील प्रतिष्ठेची करतील हा भाजपचा अंदाज खरा ठरला. मोहिते-पाटलांनी माळशिरसमधून मताधिक्य तर दिलेच. करमाळा, माढ्यातील शिंदे विरोधकांची मोट बांधली. त्यामुळे करमाळा, माढ्यातून शिंदे यांना म्हणावे तसे मताधिक्य मिळाले नाही. मोहिते-पाटील खऱ्या अर्थाने किंगमेकर ठरले.
  • परिचारक,राऊत,औताडे यासारख्या मित्रांचा विश्वासघात करणे संजय शिंदे यांना चांगलेच महागात पडले. राष्ट्र्वादिकडून तिकीट घेण्याचा निर्णय या नेत्यांना विश्वासात न घेता शिंदे यांनी घेतला होता अशी चर्चा आहे. हा निर्णय शिंदे यांना चांगलाच महागात पडला.पुढे याच मित्रांनी मोहिते-पाटील आणि भाजपला साथ दिल्याने शिंदेंवर पराभवाची नामुष्की ओढावली.
  • माढा लोकसभा मतदारसंघातून 1 लाखाचे मताधिक्य देऊ अशी ग्वाही माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिली होती. त्यानुसार प्रत्यक्ष मतमोजणी वेळी माळशिरसचे मताधिक्य निर्णायक ठरल्याचे दिसून आले.