fbpx

 संजय निरुपमांना शिवसेनेतून काढण्यासाठी भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा होता हात !

टीम महाराष्ट्र देशा  : वर्ष होतं २००४ चं ही त्या काळातील गोष्ट आहे ज्याकाळात संजय निरुपम एक फायरब्रांड शिवसैनिक होते. शिवसेनेचे हिंदी मुखपत्र ‘दोपहर सामना’चे संपादक सुद्धा होते. त्याकाळात संजय निरुपम यांनी ओळख बाळासाहेब ठाकरे यांचे दत्तक पुत्र अशीच होती.

२००४ लोकसभा निवडणूक… संजय निरुपम यांना मुंबई (उत्तर-पश्चिम) लोकसभेच्या जागेवरून शिवसेने मैदानात उतरवले होते. समोर आव्हान होतं कॉंग्रेसचे दमदार नेते आणि अभिनेते सुनील दत्त यांचं. ही जागा कॉंग्रेसची हक्काची होती याच जागेवरून सुनील दत्त तब्बल ४ वेळा खासदार म्हणून निवडणून आले होते. त्यामुळे सुरवातीला ही लढाई पूर्णपणे एकतर्फी वाटत होती.

पण संजय निरुपम मैदानात उतरले आणि आपल्या जबरदस्त भाषणांनी त्यांनी सगळा माहोलच बदलून टाकला. संजय निरुपम यांना हरवण्यासाठी सुनील दत्तांना रक्ताचं पाणी कराव लागल होत. त्यावेळी निरुपम फक्त ४७ हजार ३५८ मतांनी पराभूत झाले होते. मात्र त्यांच्या लढण्याच्या जबराट वृत्तीने विरोधाकंना देखील त्यांचे जबरा फॅन बनवले होते.

वर्ष २००५ शिवसेना आणि भाजपची युती होती… पण संजय निरुपम यांची लेखणी आग ओकत होती ती भाजपच्या विरोधात. तत्कालीन भाजपची तोफ असणारे नेते प्रमोद महाजन यांच्याशी निरुपण यांचा छत्तीसचा आकडा होता. महाजांना कोंडीत पकडायला संजय निरुपम एकही संधी सोडत नव्हते. या सगळ्यामध्येच समोर आले देशभरात खळबळ माजवणारे रिलायंस इंफोकॉमच्या शेयर घोटाळ्याचे प्रकरण. त्यावेळी केंद्रीय दूरसंचार मंत्री होते प्रमोद महाजन. त्यांच्या जवळच्या व्यासायिकाला चुकीच्या पद्धतीने शेअर दिल्याचा ठपका महाजनांवर होता.

संजय निरुपम यांनी आपला मोर्चा सरळ प्रमोद महाजनांच्या विरोधात वळवला होता. त्यांनी ‘दोपहर सामना’ मधून प्रमोद महाजन यांना सरळ-सरळ ठोकायला सुरवात केली. पण ते शिवसेनेचे पदाधिकारी होते हे कदाचित ते विसरले असावेत. फेब्रुवारी २००५ ची गोष्ट आहे प्रमोद महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर दबाव टाकयला सुरवात केली. संजय निरुपम यांच्या लेखणीला सामनामधून ब्रेक देण्यात यावा यासाठी हलक्या आवाजात चर्चा सुरु झाली होती. पण अखेर ९ मार्च २००५ रोजी उद्धव ठाकरे यांनी संजय निरुपण यांना प्रमोद महाजन यांची सार्वजनिकरित्या माफी मागण्यास सांगितली. पण संजय निरुपम हे मूळचे पत्रकार आणि कडक स्वभावाचे असल्याने त्यांनी झुकणं नामंजूर केलं आणि शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला.

संजय निरुपम यांची आता मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून गच्छंती झाली असून त्यांच्या जागी कॉंग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांची वर्णी लागली आहे. संजय निरुपम यांची हकालपट्टी होण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली मुंबई कॉंग्रेसची अंतर्गत लॉबिंग अखेर यशस्वी झाली असचं म्हंटल तर वावग ठरणार नाही.