आणि रोहित शर्माने घेतली मलिंगाची गळाभेट. . .

rohit shrma hug malinga1

वेबटीम:- विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्या झंजावाती शतक आणि गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या बळावर भारताने चौथ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर 168 धावांनी दणदणीत विजय मिळविला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 4-0 अशी आघाडी मिळवत मालिका हि आपल्या खिश्यात घातली आहे. मात्र या सामन्यात चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे मलिंगाने कर्णधार विराट कोहलीला बाद केल्यानंतर रोहित शर्माने घेतलेली मलिंगाची गळाभेट.

का घेतली रोहितने मलिंगाची गळाभेट ?

मलिंगानं विराटला बाद करताच त्याच्या आंतरराष्ट्रीय करियरच्या 300 विकेट पुर्ण झाल्या. या सामन्यात मलिंगा स्वत: कर्णधार होता. शतकवीर कोहलीला बाद करुन मलिंगाने आपल्या बळींचे त्रिशतक पूर्ण केले. दिग्गज मुथय्या मुरलीधरननंतर (५३४) अशी कामगिरी करणारा तो श्रीलंकेचा दुसरा, तर जगातील १३ वा गोलंदाज ठरला आहे.

मलिंगाने विराटला बाद केल्यावर रोहित शर्मा याने त्याचे अभिनंदन केले. त्यावेळी त्याने मलिंगाला मिठी मारली. हे दृश्य पाहिल्यावर भारतीय प्रेक्षक हैराण झाले की हे काय झाले. पण जेव्हा समजले की मलिंगाने 300 विकेट घेतल्या त्यानंतर प्रेक्षकांचे डोळे उघडले त्यानंतर क्रिजवर आलेल्या हार्दिक पांड्यानेही मलिंगाचे अभिनंदन केले.