fbpx

‘रिलेशन’ तोडायचच होते तर जोडले कशाला ?

relationship

 

अक्षय पोकळे:- ‘ताणले कि तुटणारच’ अशी एक आपल्याकडे प्रचलित म्हणी आहे.  जी सर्वांनाच माहित आहे पण सर्वजण त्या म्हणीचा अर्थ समजुन घेऊन चालतातच असं नाही ना.. नातं कोणतेही असो… त्यामधे तणाव आला कि नाते तुटतेच, तुटलेल्या नात्यांना परत जोडणे जितके अवघड असते त्यापेक्षा नाते का तुटले हे समजुन घेणे सोपे असते, चुका झाल्यानंतर परत अश्या चुका होऊ नये म्हणुन चुका सुधारावा लागतात आणि चुका झाल्यानंतर परत अश्या चुका होऊ नये म्हणून घ्यावी लागणारी काळजीच जर आपल्याला घेता आली नाही तर यालाही चुकच म्हणतात.

ज्यांना नात्यांची किंमत समजते त्यांनाच स्वतःच्या चुका समजतात आणि ते लोक स्वतःच्या चुका सुधारतात सुद्धा पण आजकालची तरुणाई चालता बोलता नाती तोडतात, हि नाती असतात प्रेमाची आणि प्रेम संबंधांची . नाते का तुटले..? तुटण्याचे कारण काय होते..? नाते एवढे कमकुवत होते का..? अश्या प्रश्नांची उत्तरे शोधायला पण त्यांच्याकडे वेळ नसतो..  जर तोडायचेच होते तर जोडले कशाला याचा तरी विचार करा.. नात्यांच्या तुटण्याचे कारण समजुन घ्या खरंच खुप शिकायला मिळेल.

निष्ठा & प्रामाणिकपणा: नात्यात निष्ठा असायला हवी, स्वतःच्या पार्टनर बरोबर प्रामाणिक असायला हवे.

अहंकार: नात्यात अहंकार आला कि नात्याची राख व्हायला वेळ लागत नाही, अहंकार कोणाला दाखवायचा हे तरी शिकुन घ्या, आपल्याच माणसाला जर अहंकार दाखवला तर तुमचा अहंकार पुढे जातो मात्र नातं मागेच राहते.

संभाषण: एकमेकांच्या समस्यांवर संभाषण केले नाही नाही तर एकमेकांच्या समस्या कश्या समजणार, कोणालाच मनातलं वाचता येत नाही ना… नाहीतर संभाषण करण्याची वेळच आली नसती.

शंका: नात्यात शंकेला जागा देऊ नका, समोरच्या व्यक्तीला शंका येईल असं वागणंच टाळा कारण शंका हा खुप मोठा & खुप खराब किडा आहे जो आपल्याला & आपल्या नात्याला सुद्धा हळू हळू खात असतो & आपल्याला हे समजत नसतं.

वैयक्तिक स्वातंत्र्य: हे करू नको, ते करू नको, हिच्या/याच्या/तिच्या/त्याच्या बरोबर  बोलायचं नाही अशी बंधने लादल्यावर समोरचा व्यक्ती कंटाळतो, समोरच्या व्यक्तीवर त्यांचे स्वतःचे आई-बाप बंधने लादत नाहीत मग तुम्ही त्यांच्यावर बंधने लादली तर हि बंधने ओझं बनुन जातात.