…म्हणून काँग्रसे प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदीने केला शिवसेनेत प्रवेश !

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रसेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. प्रियांकाने यांनी काँग्रसेची साथ सोडून शिवसेनेचा हाथ का पकडला याबद्दलच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसमधील अनेक नाराज मंडळीनी पक्षाची साथ सोडली. या यादीमध्ये  काँग्रसेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांचेदेखील नाव सामील झाले आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतंच काँग्रेसवर टीका केली होती. आपल्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अभय दिल्यामुळे चतुर्वेदींनी संताप व्यक्त केला होता. ट्विटरवरुनही चतुर्वेदींनी नाराजी व्यक्त केली होती.

प्रियंका चतुर्वेदी यांनी, मी अत्यंत विचारपूर्वक माझा निर्णय घेतला आहे. शिवसेनेला फक्त मुंबईतच नाही, तर संपूर्ण देशात जिथे मजबूत करण्याची जबाबदारी दिली जाईल ती पार पाडेन तसेच १० वर्षे नि:स्वार्थपणे काँग्रसेमध्ये सेवा केली. मात्र, काँग्रेसमध्ये मला गैरवर्तवणुकीचा सामना करावा लागला. आता यापुढे शिवसेनेच्या प्रसारासाठी काम करणार आहे असे सांगितले.

कोण आहेत प्रियांका चतुर्वेदी ?

प्रियांका चतुर्वेदी या लेखक असून त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलं आहे. बाल शिक्षण, महिला सबलीकरण आणि आरोग्य यासारख्या विषयांवर त्या कार्यरत आहेत. तर मे २०१३ मध्ये प्रियांका चतुर्वेदी यांची काँग्रेस प्रवक्त्या म्हणून निवड झाली. रणदीप सुरजेवालांच्या नेतृत्वातील ‘कम्युनिकेशन विभागा’च्या त्या सदस्या आहेत.Loading…
Loading...