सैन्याच्या बळावर राजकारण का ? माजी लष्करी अधिकाऱ्यांच राष्ट्रपतींना पत्र

modi

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भारतीय लष्कराने केलेल्या कामगिरीचा प्रचारासाठी वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लष्करी कारवाईचा वापर भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी करत असल्याची तक्रार विरोधकांनी केली आहे, आता माजी लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहित आपली नाराजी दर्शवली आहे.

सैन्याच्या कामगिरीचे श्रेय राजकीय पक्षांनी घेऊ नये, असे आदेश देण्याची विनंती माजी लष्करी अधिकाऱ्यांनी केली आहे. १५६ माजी अधिकाऱ्यांनी हे पत्र लिहिले असून, यामध्ये माजी लष्कर प्रमुख दीपक कपूर, माजी जनरल एस एफ रोड्रीग्स, माजी वायुसेना एन सी सुरी यांचा समावेश आहे. लष्कर हे कोणत्याही पक्ष नाहीत, त्यामुळे राजकीय नेत्यांनी लष्कराच्या कामगिरीचा वापर प्रचारासाठी करू नये, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

लातूर येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदारांना आवाहन करत, एअर स्ट्राईक आणि पुलवामा हल्यातील शहिदांना श्रद्धांजली म्हणून भाजपला मतदान कराव, अस वक्तव्य केले होते. दरम्यान, मोदी यांच्या विरोधात कॉंग्रेससह इतर विरोधीपक्षांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती.