औरंगाबाद : ‘आधी झाडे तोडायची आणि नंतर म्हणायचे एकाच्या बदल्यात चार लावू हा कुठला न्याय झाला ? कोर्टात प्रकरण सुरु असतांना तुम्ही वृक्षारोपण कसे करू शकता. असा खरमरीत टोला पक्षी मित्र आणि पर्यावरण प्रेमी किशोर पाठक यांनी औरंगाबाद महापालिकेस लगावला.
सिडकोतील प्रियदर्शिनी उद्यानात मनपाच्या वतीने उभारण्यात येणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम तूर्त ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे सोमवारी दिले. या उद्यानातील अनेक झाडे तोडून स्मारक उभारण्याची मनपाची योजना आहे. मात्र कोर्टाने याबाबत फटकारल्यानंतर मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी आज (दि.२३) लगेचच प्रियदर्शिनी उद्यानाची पाहणी केली. सोबतच वृक्षारोपणाचे आदेशही दिले. अस्तित्वात असलेल्या झाडांची काळजी न घेता नवीन झाडे लावून वृक्षप्रेमी असल्याचे चित्र पांडेय का निर्माण का करत आहेत.
‘महाराष्ट्र देशा’ने याविषयी पक्षी मित्र असलेले आणि प्रियदर्शिनी उद्यान वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या किशोर पाठक यांचाकडून जाणून घेतले. यावेळी ते म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी प्रियदर्शिनीत अनेक झाडे तोडण्यात आली. आता झाडे लावण्याचे नाटक कशासाठी? आधीच्या झाडाचा खच पडलेला असतांना ती घाण साफ करून जुनी झाडे जगवायला हवीत.
तर मनपा नवीन झाडे का लावत आहे ? याठिकाणी व्यावसायिक कृती न करता जैव विविधता जपणे हाच आमचा हेतू आणि मागणी आहे. वृक्षारोपण जर मनपा करत असेल तर तो कोर्टाचा अवमान असेल. पालक मंत्र्यांनी पाणी देण्यास सांगितलेले असतांना त्यांचाही अवमान पालिकेने याआधी केलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पांडेय यांचे डॅमेज कंट्रोल; कोर्टाच्या आदेशानंतर प्रियदर्शिनीत वृक्षारोपण
- मंगल कार्यालय, फोटोग्राफर व आचाऱ्यालाही तपासावे लागणार नवरीचे वय
- एसटीच्या उत्पन्नात हिंगोली आगारात साठ टक्क्याची घट
- ठाकरे-पवार व अधिकाऱ्यांमधील बैठकीत झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय
- महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी ‘संकल्प अभियान’