यामुळे माझा आवाज दाबला जातोय – निखील वागळे.

महाराष्ट्र देशा स्पेशल : महाराष्ट्रातील सगळ्यात आक्रमक पत्रकार कोण ? हा प्रश्न विचारल्यानंतर कोणी हि उत्तर देईल ते म्हणजे ‘निखिल वागळे’. आज पुन्हा एकदा वागळे  महाराष्ट्र तसेच देशात चर्चेचा विषय बनले आहेत . आणि ते म्हणजे टीव्ही ९ या वाहिनीवर सुरु असणारा त्यांचा ‘सडेतोड’ हा कार्यक्रम अचानक बंद करण्यात आल्यामुळे.  बुधवारी ( दि १९ ) रात्री दररोजच्या वेळेनुसार संध्याकाळी ९ वाजता हा कार्यक्रम ‘ऑन एअर’ जातो. मात्र गुरुवार सकाळ उजाडली ती ‘निखिल वागळें’चा सडेतोड हा ‘डिबेट शो’ बंद झाला ह्या बातमीने. पण अचानक हा कार्यक्रम बंद का झाला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. याचीच ‘बातमी मागची बातमी’ महाराष्ट्र देशा आता सर्वांच्या समोर आणत आहे.

का बंद झाला निखिल वागळेंचा सडेतोड?

देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात शेतकरी संप पुकारला गेला . या संपात सर्वच मिडीयाने शेतकऱ्याची बाजू जोरात लावून धरली . मात्र निखिल वागळे यांनी स्टुडियोमधून तर ह्या संपावर ‘सडेतोड’ घेतलाच पण ज्या पुणतांब्यातून शेतकरी संपाची हाक दिली गेली, थेट त्याच गावातून वागळे यांनी सडेतोड कार्यक्रम करत राज्य सरकारवर सडकून टीका केली.  पुणतांब्यानंतर पुढे नाशिकमध्ये जाऊन ‘मी’ शेतकरी संपावर घेतलेली भूमिका आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला उघड पाडल त्यामुळे ‘ते’ही माझ्यावर नाराज होते. यामुळे आपल्याला टार्गेट केल जात असल्याच वागळे यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगितल आहे.

पुढे काय म्हणाले निखिल वागळे पहा हा व्हिडिओ